Saturday, 13 September 2014

                                                            नागपुर  सौर पथ दिवे




 
 


  1.    12 Voltage  :-System Voltage , Solar Photo Voltaic  Voltage  

  1.   System Back Up 12 Hours , All  systems Dusk to Down ,

  1.   System Pole OD 3" of G.I Pole ( ISI Mark )

  1.  System Cost Payment 100 %  Advance

  1.  After payment Received material delivery  within 25 working days

  1.  System Warranty after Installation Up to 3 Years


  1.  
  1.  Installation & Transport Charges & Loading  Unloading   Extra , at Actual
  1. Installation & Commissioning Ire action  Per Pole Rs. 1500/- 

                   & above  10 Pole Installation & Commissioning Ireection  Per Pole Rs. 1000/- Each
  1.  We Can design system as per customer Need also ……….




SR.NO
Product Code
SHIVAJI  Solar Street light
LED
Watt
 Height
Mtr.
Ah
SPV WP
Compare
CFL/Tube Light
With
Pole
W/O Pole

1
SHIV -SSL 3157
Compound / Temple solar
3
4
7.5
15
18 W
11960
9573

2
SHIV -SSL 72015
Garden / Mohalla solar
7
4
25
40
40 W
16675
13340

3
SHIV-SSL 95042
Gram Panchayat solar
9
4
42
50
60 W
18615
14892

4
SHIV -SSL 9910070
Gram Panchayat Sq. 
9 x 2 no
4
70
100
60 W x 2 No
30187
24150

5
SHIV-SSL 115042
Office Road 
11
4
45
50
80 W
26234
20987

6
SHIV-SSL 22125100
Office Road Sq. 
11 x 2 no.
6
100
125
80 W x 2no
41184
32947

7
SHIV-SSL 1510070
Community Hall
15
6
70
100
100-130 W
33493
26795

8
SHIV-SSL 24125100
Co-Operate  Office 
24
6
100
125
150 W
41328
33062

9
SHIV-SSL 30150130
Co-operate Office Sq. 
30
6
130
150
150-180 W
44901
41000







9850722808





                            Hope your consideration is appreciable and calls us for your service, at any time further to any clarifications kindly contact the under signed. Thanking you and assuring of our best service all time

With Regards, Shivnivrutti universal solar systems


                                                 Nagpur Solar Water Heater





 renewable energytechnologies that have been well established for many years. SWH has been widely used in Australia, Austria, China, Cyprus, Greece, India, Israel, Japan, Jordan, Spain and Turkey.
In a "close-coupled" SWH system the storage tank is horizontally mounted immediately above the solar collectors on the roof. No pumping is required as the hot water naturally rises into the tank through thermosiphon flow. In a "pump-circulated" system the storage tank is ground- or floor-mounted and is below the level of the collectors; a circulating pump moves water or heat transfer fluid between the tank and the collectors.
SWH systems are designed to deliver hot water for most of the year. However, in winter there sometimes may not be sufficient solar heat gain to deliver sufficient hot water. In this case a gas or electric booster is used to heat the water.

Tuesday, 26 August 2014

सौर ऊर्जेशिवाय तरणोपाय नाही


ऊर्जा निर्मिती हा आपल्या देशापुढचा फार मोठा गहन प्रश्न झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. देशात अलिकडच्या काळात औद्योगिकरणाला मोठी गती आल्यामुळे विजेची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे विजेच्या सर्व पर्यायांचा वापर करून शक्य तेवढी वीज निर्मिती करण्यावर सरकारचा भर दिसून येत आहे. सद्या आपल्या देशामध्ये १ लाख ६५ हजार मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होते. परंतु ही वीज पुरेशी नाही. याचा परिणाम आपल्याला, उद्योजकांना, शेतकर्‍यांना सातत्याने  भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. भारनियमन कमी करायचे असेल तर वीज निर्मिती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. दरवर्षी ३.६ टक्के एवढी विजेची मागणी वाढत चालली आहे. या सगळ्याचा विचार केला तर भविष्यात म्हणजे २०३० सालापर्यंत देशात ९ लाख ५० हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी राहणार आहे. म्हणजे आगामी १९ वर्षात आपल्याला देशात वीज निर्मितीत सहापट वाढ करावी लागणार आहे. 
 भारतात प्रामुख्याने कोळसा जाळून वीज तयार केली जाते. असा क्रम असाच सुरू राहिला तर एक ना एक दिवस या पृथ्वीच्या पोटातील कोळशाच्या साठ्यांना मुकावे लागणार आहे. म्हणजे औष्णिक वीज निर्मितीला मर्यादा आहेत. तीच अवस्था जलविद्युत निर्मितीची आहे , असे म्हणावे लागेल. देशात जलविद्युत निर्मितीसाठी आवश्यक अशा जागा  उपलब्ध नाहीत. त्यामुळे या प्रकल्पलाही  मर्यादा आल्याच.बाकीच्या गैरपरंपरागत वीज निर्मितीच्या साधनांमध्ये सौर ऊर्जा हाच एक मार्ग असा आहे की, ज्याच्या साधनाला कसल्याही मर्यादा नाहीत. देशात अन्य देशांच्या तुलनेत ऊन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे ऊन्हाला आपल्या देशात तोटा नाही , असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. 
सूर्य लाखो वर्षांपासून आग ओकतो आहे. यापुढेही लाखो वर्षे आग ओकत राहील. त्यामुळे या ऊर्जा साधनाचा पुरेपूर वापर करण्याचे ठरविले तर पुढे शेकडो वर्षे देशाला वीज कमी पडायची नाही. वीज टंचाई जाणवणार नाही. सौर ऊर्जा जोखीमविरहीत आहे. अणु ऊर्जा जोखमीची आहे. औष्णिक ऊर्जा प्रदुषणकारी आहे. असा कोणताही तोटा, नुकसान करण्याचा प्रकार या सौर ऊर्जेने होणार नाही. अलिकडच्या काळात सरकारने याचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात वेगाने पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब चांगलीच म्हटली पाहिजे. उशिराने सुचलेले शहानपण वाया जात नाही.
भारताला जगातील अन्य देशाच्या तुलनेत सूर्य प्रकाश प्रचंड प्रमाणात मिळत आहे. तरीही आपण त्याचा वापर करण्याचा अट्टाहास धरला नाही. त्यादृष्टीने संशोधन पुढे सरकले नाही. अर्थात राज्यकर्त्यांनी काळाची पावले ओळखण्यात चूक केली. अन्य प्रगत देशांनी मात्र पुरेसा सूर्य प्रकाश उपलब्ध नसतानाही या क्षेत्रात कमालीची प्रगती केली आहे. आपल्याजवळ मुबलक असूनही त्याचा वापर करता आला नाही. जिथं पिकतं , तिथं त्याची किंमत कळत नाही, हेच खरं ! अन्य देशात सौरशक्तिकेंद्र उभारून मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरीत करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.
सध्या प्रत्येक राष्ट्राची विजेची गरज ही फारच वाढली आहे. आणि इतर ऊर्जा पदार्थांची मुबलकता कमी झाली आहे. त्यामुळे सौर ऊर्जेच्या पर्यायावर सर्व राष्ट्रांचा भर आहे. सौरऊर्जेच्या उपयोगाची आधुनिक उपकरणे पुढीलप्रमाणे आहेत. पेटीचा कुकर, सौरभट्टी, पाणी गरम करण्याचा प्लॅट, प्लेट कलेक्टर, गरम हवेचा कलेक्टर, शेतीचे पदार्थ वाळविण्यासाठी ड्नयर, खाऱ्यापाण्यापासून गोडेपाणी करणारा सोलर स्टील, उबदार राहणारे सौर घट, हिट पंप अशा अनेक प्रकारची सौर ऊर्जा उपकरणे विकसित झाली आहेत.

परदेशामध्ये पॉवर प्लॅट, सूर्य विजेवर चालणारे फ्रिज, सूर्यवीज केंद्रे इत्यादी वापरात आले आहेत. भारतामध्ये सुध्दा आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सूर्यशक्तिचे प्रकल्प अनेक ठिकाणी सुरू आहेत. भोर-नाशिक भागातील रस्त्यावरील दिवे सूर्य विजेवर चालतात. धुळे जिल्ह्यात ३२० एम. डब्ल्यू. सूर्य वीज प्रकल्प १९८५ मध्ये सुरू झाला आहे. सद्या याच जिल्ह्यात १५० मेगावॅत क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. चंद्रपूरलाही मोठा प्रकल्प होत आहे. तामीळनाडूत सूर्यविजेवर रेल्वे सिग्नल, तिरूपती-बंगळूर-विशाखापट्टणम येथे इंटरलॉक पध्दती, ग्रामीण पंपासाठी, सूर्य विजेचा वापर दिल्लीजवळ मसुदपूर खेड्यात प्रत्येक घरात स्वयंपाक, दिवे, पाण्याचे पंप, टी. व्ही. रेडिओ हे सर्व सूर्यविजेवर चालतात. अपंगाच्या सायकलीसाठी सूर्य ऊर्जा वापरली जाते.
सध्याच्या विज्ञानयुगात प्रगत तंत्रज्ञानासाठी लागणारीवीज अंतराळात मोठ्या प्रमाणात निर्मिती करून तिचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे अंटार्क्टिका मोहिमेसाठी उपग्रहाच्या रिमोट कंट्रोलसाठी, रडार यंत्रणा इत्यादी ठिकाणी सूर्य विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

सौर ऊर्जा महाग वाटत असली तरी अंतिमतः स्वस्त पडते. १९९० च्या दशकामध्ये अनु, जल, आणि औष्णिक या विद्युत निर्मितीच्या प्रकारांचा उत्पादन खर्च सौर ऊर्जेपेक्षा फारच कमी होता. सौर ऊर्जा त्यामानने खूपच महाग होती. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प फारसे वाढले नाहीत. पण आता परिस्थिती उलटी आहे. अंतिम दृष्ट्या पाहिले तर सौर ऊर्जा स्वस्त पडते. कारण या प्रकल्पाचा राखरखवाचा खर्च फार कमी आहे.  कुठले प्रदूषण होत नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणावर होणारा अन्य खर्च  टळतात. प्रदूषण होणे हासुद्धा अपव्यय आहे. असा विचार केला तर सौर ऊर्जा प्रकल्प स्वस्तच पडतात. त्यामुळे दूरगामी विचार करून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आवश्यक आहे.

देणे निसर्गाचे : सौरऊर्जेचे उपयोग



वाचकहो, याआधीच्या लेखामध्ये आपण सौरऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी कसा केला जातो हे पाहिले. या लेखामध्ये आपण सौरऊर्जेचे अजून काही उपयोग पाहणार आहोत.
आपल्या देशामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा उपयोग हा पाणी गरम करण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी, पाण्याची वाफ करून ती औद्योगिक कारणांसाठी वापरणे वगरेसाठी होऊ शकतो. आज आपण प्रामुख्याने स्नानाकरिता लागणारे गरम पाणी तापविण्याच्या सौर प्रणालीबद्दल तसेच सोलर कुकरबद्दल माहिती घेऊयात.
आपण सर्वानी इमारतींच्या गच्चीवर बसविलेले सौरबंब पाहिले असतीलच. सूर्याकडून वर्षांकाठी जवळजवळ १० ते ११ महिने मुबलक मिळणाऱ्या या पूर्णत: मोफत अशा ऊर्जेचा वापर करून आपण किमान अंघोळीसाठी लागणारे पाणी गरम करून, विजेचा वापर कमी करू शकतो! खरे तर घरगुती वापराच्या विद्युत उपकरणांमध्ये गरम पाण्यासाठी वापरले जाणारे बॉयलर्स अथवा गिझर्स हे विजेचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे एकदाच सौर बंब बसविल्याने आपण कित्येक वष्रे मोफत गरम पाण्याचा आनंद लुटू शकतो!
सौरबंब हे १०० लिटर क्षमतेपासून पुढे दहा हजार/ वीस हजार/ तीस हजार लि. असे कितीही क्षमतेचे बसविता येतात. साधारणपणे 'एका व्यक्तीस एक बादली एका वेळेस' या हिशेबाप्रमाणे चार जणांच्या एका कुटुंबाला सामान्यत: १२५ लि. क्षमतेची प्रणाली पुरू शकते. अर्थात, थंडीच्या दिवसांचा, येणाऱ्या पाहुण्यांचा विचार केल्यास १५० ते २०० लि. ची प्रणाली जास्त आरामात वापरता येते. सौर प्रणाली बसविताना तिच्या क्षमतेचा व वापर करण्याच्या सवयींचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. उदा. कुटुंबामध्ये जरी चार सदस्य असले तरी काही जणांना सकाळ-संध्याकाळ असे दोन वेळेस स्नान करण्याची सवय असते. त्यामुळे संध्याकाळी प्रणालीतून गरम पाणी काढून घेतल्यावर टाकीमध्ये आलेले गार पाणी तापवायला रात्री सूर्य नसतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीला गार अथवा कोमट पाणी मिळते. हे टाळण्यासाठी मुळातच थोडी जास्त क्षमतेची प्रणाली बसविणे गरजेचे आहे. तसेच (विशेषत: मोठय़ा सोसायटीमध्ये) सकाळी साधारणत: दहानंतर प्रणाली वापरणे थांबविल्यास दिवसभराच्या उन्हामुळे पाणी चांगले तापते.
सौरबंब हे शक्यतो कोणत्याही विद्युत साधनाव्यतिरिक्त म्हणजे- N.T.S. (Natural Thermo Siphon) या तत्त्वावर चालविल्यास त्यांना अक्षरश: १०/१५ वष्रे विशेष असा देखभालीचा खर्च येत नाही. पण अशा प्रणाली दीड ते दोन हजार लि. क्षमतेपर्यंतच चांगली कार्यक्षमता देतात. त्यापुढील क्षमतेसाठी मात्र मोटार पंप, कंट्रोल पॅनल, सेन्सर्स, इ.चा वापर करावा लागतो व ही विद्युत उपकरणे असल्याने त्यांच्या देखभालीचा खर्च अधूनमधून येऊ शकतो. मात्र अशा प्रणालींना वीज खूप कमी प्रमाणात लागते.
सौरबंबाचा वापर अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी होत असल्याने सर्वच ठिकाणी जसे- घरे, बंगले, सोसायटी, लॉजेस, हॉटेल्स, होस्टेल्स, हॉस्पिटल्स, देवस्थाने, गेस्ट हाऊसेस, फार्म हाऊसेस इ. ठिकाणी उपयोग होऊ शकतो. ही प्रणाली म्हणजे सौर पटले (सोलर पॅनल्स) व पाण्याच्या टाक्या या इमारतीच्या गच्चीवर बसविण्यात येतात. त्यातूनही सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे सोलर पॅनल्सही गच्चीवरती 'सावलीविरहित जागेमध्येच' (shadow free area) बसविली गेली पाहिजेत. अर्थात, शहरी भागात उंच, बहुमजली इमारतीमुळे सदनिकांच्या प्रमाणात आवश्यक तेवढी 'सावलीविरहित जागा' उपलब्ध नसते. अशा वेळी गच्चीवर लोखंडी सांगाडा (structure) करून त्यावर पॅनल्स बसविणे हाच एक पर्याय राहतो. त्याचबरोबर नवीन इमारत बांधताना व विशेषत: गच्चीचे रेखाटन करताना ते गच्चीवरती कमीत कमी सावली येऊन जास्तीत जास्त वेळ ऊन राहील असे केले गेले तर त्याचा उपयोग सौर ऊर्जेचा कोणताही वापर करताना होऊ शकतो. 
सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी  एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहे, पण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थात, ठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेट, या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य!  
सौरबंबामधून गरम झालेले पाणी हे अंघोळीव्यतिरिक्त हॉटेल्स/ कंपनी कॅण्टीनमध्ये भांडी धुण्यासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. अनेक कारखान्यांमध्ये 'बॉयलेर फीड वॉटर' म्हणून सौरबंबामधून भौगोलिक परिस्थितीप्रमाणे ७५ ते ८० डी. सें. पेक्षा जास्त तापमानाचे पाणी मिळू शकते व पाण्याची वाफ करण्यासाठी होणारा इंधनावरचा खर्च कमी करता येतो.
सौरऊर्जेच्या या अत्यंत महत्त्वाच्या उपयोगाव्यतिरिक्त अन्न शिजविणे, औद्योगिक वापरासाठी पाण्याची वाफ करणे (३०० डी. सें.पेक्षा जास्त!), सोलर ड्रायर इ. अनेक कारणांकरिता सौरऊर्जेचा वापर होतो. लहानशा कुटुंबाला सोयीस्कर असा तीन किंवा चार भांडय़ाचा 'सोलर बॉक्स कुकर'पासून ते शेकडो/ हजारो माणसांचा स्वयंपाक करू शकणारे 'सोलर पाराबोलिक कुकर'देखील उपलब्ध आहेत
Amol Wakudkar
Mob.9850722808
M/S Shivnivrutti Universal Solar
www.snusolar.co.in
email:- shivnivrutti@gmail.com

      "सौर ऊर्जा निर्मिती" ठरणार काळाची गरज...

                                                            
महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वीजेचे संकट उभे आहे. वीज कंपनीचा वाढत असलेला तोटा आणि सातत्याने वाढणारा वीजेचा दर ग्राहकांवर लादला जात आहे. यावर पर्याय म्हणून लवकरच "सौर ऊर्जा" ही काळाची गरज ठरणार आहे.

रेडिओ, फ्रीज, कूलर, फोन, मोबाईल या चैनीच्या वाटणार्‍या पूर्वीच्या वस्तू आज काळाची गरज ठरल्या आहेत. सध्या महाग आणि चैनीची वाटत असली तरीही "सौर ऊर्जा" अर्थात सोलर एनर्जीची गरज निर्माण होऊ लागली आहे...
कोकणातील रत्नागिरी नजीक ९,९०० मेगावॉट क्षमतेचा आणि जगातील सर्वात मोठा मानला जाणारा नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मार्च ११ ला जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ८.९ रिश्टर स्केल असून यानंतर आलेली त्सुनामी लाट यामुळे झालेल्या नुकसानीतून आता तीन महिने उलटूनही देश पूर्णपणे सावरलेला नाही. आणखी भूकंप होऊन आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती लोकांच्या मनातून गेलेली नाही. वास्तविक जपान हा देश तंत्रज्ञानात अग्रेसर असून स्थिरचित्ताने शांततेने निर्णय घेण्यासाठी या देशाचा नावलौकिक आहे. सुमारे ४८ फूट उंचीच्या एका लाटेने फुकुशिमा येथील तीनपैकी एका अणुभट्टीला तडाखा दिल्याने या भट्टीतून किरणोत्सर्ग होऊन या किरणोत्सर्गाचे अत्युच्च पातळी गाठलेले पाणी प्रशांत महासागरात देखील गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. कारण काहीही असले तरीही नुकसान झाले आहे हे नक्की! 

नियोजित जैतापूर अणुप्रकल्प सुद्धा सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. या प्रकल्पामुळे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्त होणार असल्याचे स्थानिक जनतेचे मत आहे. मात्र, या प्रकल्पामुळे बेरोजगारी कमी होऊन वीज निर्मिती वाढणार असल्याचा पुनरोच्चार शासनाने केला आहे. जपानच्या फुकुशिमा अणुभट्टीचे उदाहरण भारतानेही डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. भविष्यातील भूकंपाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मध्य जपानमधील हामाओका अणुप्रकल्प बंद करण्याचा आदेश नुकताच पंतप्रधान नाओटो कान यांनी दिला आहे. हा आदेश व घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा, लक्षवेधी आहे. मानव निसर्गाच्या सामर्थ्यापुढे टिकू शकत नाही ही बाब आता तज्ज्ञांनाही मानावीच लागेल. तरी सुद्धा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास रिश्टर स्केल ९.० तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाल्यास, त्सुनामी आल्यास जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून किंवा याचे प्रमाण शक्य तितके कमी होण्याच्या उपाययोजना अगोदर करून त्याचे प्रयोग, प्रात्यक्षिक करणे अत्त्यावश्यक आहे. देशात सध्या बहुसंख्य वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमती वाढत आहेतच. वीज निर्मितीसाठी पुरविला जाणारा कोळसा, त्याची उपलब्धता, गुणवत्ता इ. बाबी फारशा गांभीर्याने घेतल्या जाताना दिसत नाहीत. परिणामी उपलब्ध होणार्‍या कोळशातून बराच कोळसा वाया जातो, फेकून द्यावा लागतो अशी वीज निर्मिती केंद्रांची ओरड असते. लोकसंख्या वाढीबरोबर वीजेची मागणी देखील वाढतच जाणार हे सत्य नाकारले जाऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात वीज महाग झाली असून सततच्या भार-नियमनामुळे अनेक वीजग्राहक वीजेची बिलं भरेनासे झाले असून 'वीज द्या- बिल घ्या' असा अनेकांचा सूर आहे, याचबरोबर वाढत्या थकीत बाकीमुळे वीज कंपनीचा तोटा वाढतो आहे. हा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे दिसते. अनेक शासकीय, निमशासकीय संस्थांकडे वीजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वीज चोरीकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करावे लागत असल्याची वीज कंपनीचीच तक्रार असते. मध्य प्रदेशात लवकरच वीज किमान ८ टक्क्यांनी महाग होणार असल्याचे वीज नियामक आयोगाने सुचित केले आहे. ठिकठिकाणच्या ट्रान्सफार्मरला लागणारे इंधन देखील महाग झाले आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी जास्त होत असून ग्रामीण भागात विशेषतः शेतीला जास्त पाण्याची आवश्यकता असते, परंतु किमान बारा तासांच्या भार-नियमनामुळे, अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काही वेळा तर पीक हातचे जाण्याच्या, जळण्याच्या आणि शेतकरी बांधवांचा हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा पडत असल्याच्या घटना घडतात.

जागतिकीकरण अर्थातच ग्लोबलायझेशनमुळे वातावरणात अनुचित बदल झाले असून वातावरणात एकूणच उष्णता वाढली असल्याचे जाणवते. याचा फायदा करून घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सूर्याच्या ऊर्जेच्या सहाय्याने वीज-निर्मिती करण्याचा मोठा प्रकल्प शासनातर्फे सुरू करण्यात यावा. सौर ऊर्जेचे महत्व नागरिकांना पटले असून त्याचा प्रभाव अगदी ग्रामीण भागातही पडलेला तेथील सौरऊर्जेच्या पथदिव्यांवरून दिसून येतो. शहरात सुद्धा उद्याने, सार्वजनिक ठिकाणांवर सौर ऊर्जेच्या सहाय्याने चालणारे पथदिवे बसविण्यात येऊन ते व्यवस्थित कार्य करीत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी सौर कंदिलांचा वापरही करण्यात येत असून अवघ्या पाच वर्षांपूर्वी धनाढ्यांच्या गच्चीवर दिसणारी 'सोलर सिस्टीम' आता मध्यम वर्गीयांच्याच नव्हे, तर ग्रामीण भागातही दिसू लागली आहे. Life Time Investment असे याला म्हटले जाते. 'सोलर पॅनल' द्वारे वाहन चालविण्यासह ऊर्जा तयार करून वीज निर्मिती ही संकल्पना आता देशात रूढ होत आहे. वाट्टेल तितकी वीज, चोवीस तास वीज निर्मिती होऊन विकास साधणारी ही योजना साकार झाल्यास सौर ऊर्जा लवकरच काळाची गरज ठरेल, तो दिवस दूर नाही 

Amol Wakudkar
Mob.9850722808
www.snusolar.co.in
Email:- shivnivrutti@gmail.com