Tuesday, 26 August 2014

असे आहे सौर वाळवणी यंत्र

                                                          
सूर्यकिरणे प्लॅस्टिक आच्छादनातून एकदा वाळवणी यंत्रात शिरल्यानंतर पुन्हा ती आतल्या आतच परावर्तित होत राहतात, त्यामुळे आतील तापमान हे बाह्य वातावरणातील तापमानापेक्षा साधारणतः 15 ते 20 अंश सेल्सिअसने वाढते. या वाढीव तापमानामुळे आत ठेवलेल्या पदार्थांची वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते.
सौरऊर्जा हा स्वच्छ, मुबलक आणि विनामूल्य स्रोत असल्याने त्याचा वापर ही काळाची गरज ठरली आहे. पारंपरिक ऊर्जा साधने मर्यादित असल्यामुळे त्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी सौरऊर्जा व इतर अपारंपरिक साधनांचा वापर करून ऊर्जा बचत करायला हवी. यामुळे ऊर्जा बचतीबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासही मदत होईल. घरगुती वापरासाठी सौरऊर्जेवर चालणारी अनेक लहान मोठी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. याचबरोबरीने सुटसुटीत, बहुपयोगी, स्वस्त आणि घरच्या घरी आपल्याला सौर वाळवणी यंत्र तयार करता येते.

सौरऊर्जेचा वापर करून प्लॅस्टिक आच्छादनाद्वारे बंदिस्त जागेत केलेली वाळवणी म्हणजे सौर वाळवणी. सूर्यकिरणे प्लॅस्टिक आच्छादनातून एकदा वाळवणी यंत्रात शिरल्यानंतर पुन्हा ती आतल्या आतच परावर्तित होत राहतात, त्यामुळे आतील तापमान हे बाह्य वातावरणातील तापमानापेक्षा साधारणतः 15 ते 20 अंश सेल्सिअसने वाढते. या वाढीव तापमानामुळे आत ठेवलेल्या पदार्थांची वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते.

...असे आहे सौर वाळवणी यंत्र - 1) वाळवणी यंत्राच्या लोखंडी सांगाड्यावर 200 मायक्रॉन जाडीच्या अर्धपारदर्शक प्लॅस्टिक शीटचे आच्छादन असते.
2) प्लायवूडपासून बनवलेल्या तळभागाला काळा रंग दिलेला असल्याने सूर्यकिरणे जास्त प्रमाणात शोषली जातात.
3) तंबूसारखा आकार व जोडणीस सोपे रचना आहे.
4) क्‍लिपच्या साहाय्याने सहज व कमी वेळेत जोडणी व काढणी शक्‍य.
5) एका वेळी 10 किलो पदार्थांची वाळवणी शक्‍य.

...असा करा यंत्राचा वापर 1) वाळवणी यंत्राची उभारणी पूर्व-पश्‍चिम अशी करावी.
2) प्लॅस्टिक आच्छादन नेहमी स्वच्छ ठेवावे. त्यावर धूळ साचू देऊ नये. यामुळे सूर्यकिरणे अडवली जाणार नाहीत.
3) उभारणी करताना प्लॅस्टिक आच्छादन क्‍लिपांच्या साह्याने घट्ट बसवावे. आतील गरम हवा बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
4) उभारणी करतेवेळी प्लॅस्टिक आच्छादन फाटल्यास ते पारदर्शक चिकट पट्टीने चिकटवून घ्यावे.
5) या यंत्राची उभारणी मोकळ्या जागेत करावी. दिवसभरात त्यावर सावली पडणार नाही याची काळजी घ्यावी.
6) शक्‍य असल्यास याची उभारणी घराच्या छतावर करावी, जेणेकरून प्राण्यांचा उपद्रव होणार नाही.
7) हे यंत्र जेव्हा वापरत नसेल तेव्हा त्यावरील आच्छादन व्यवस्थित घडी करून उंदीर, घुशी कुरतडणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावे.
8) कालांतराने प्लायवूड काळा रंग केल्यास त्याला पुन्हा रंग द्यावा.
9) सांगाडा गंजणार नाही याची काळजी घ्यावी.

सौर वाळवणी यंत्राचे फायदे - 1) उन्हातील खुल्या वाळवणीपेक्षा यामध्ये वाळवलेल्या पदार्थांचा दर्जा उत्तम असतो.
2) बाह्य वातावरणातील घटकांपासून संरक्षण मिळाल्याने सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव होत नाही.
3) प्लॅस्टिक आच्छादनामुळे हवेतील धूळ, पालापाचोळा इत्यादी आतील पदार्थामध्ये मिसळत नाहीत.
4) प्लॅस्टिक आच्छादनामुळे पाऊस व वाऱ्यापासून पदार्थांना संरक्षण मिळते.
5) प्लॅस्टिक आच्छादनामुळे पक्षी, कीटक व प्राणी यांच्यापासून पदार्थांना संरक्षण मिळते.
6) उन्हातील खुल्या वाळवणीपेक्षा यामध्ये लवकर वाळवणी होते, शिवाय रात्रीच्या वेळी पदार्थ गोळा करून झाकून ठेवावे लागत नाहीत.
7) याची उभारणी सोपी असून, उभारणीसाठी कुशल कामगाराची आवश्‍यकता नाही.
8) उन्हातील खुल्या वाळवणीपेक्षा या वाळवणी यंत्रामध्ये तेवढ्याच वस्तुमानाचे पदार्थ घेतल्यास कमी जागा लागते.
9) याच्या वापरण्याचा कमी खर्च आहे.

उपयुक्तता - 1) धान्य वाळवणीसाठी
2) मिरची, कांदा इत्यादी वाळवणीसाठी
3) पालेभाज्या वाळवणीसाठी
4) पापड, कुरड्या, शेवया इत्यादी वाळवणीसाठी
5) मासे वाळवणीसाठी
6) आवळा, सुपारी व इतर पदार्थ वाळवणीसाठी
----------
10 किलो क्षमतेच्या यंत्रासाठी आकारमान तक्ता

वरीलप्रमाणे 10 किलो क्षमतेच्या यंत्र उभारणीसाठी अंदाजे  रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. शेतीमालाची वाळवणी करून त्याचा दर्जा उंचावण्यास या यंत्रणा चांगला पर्याय उपलब्ध आहे. 
                                                                    

No comments:

Post a Comment